१७ व्या वर्षी गंगापूरच्या विद्यार्थ्याची लष्करात झेप; लेफ्टनंट पदासाठी उत्कर्ष मोहरेची निवड

Foto
विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत व चिकाटी यामुळेच हे उल्लेखनीय यश

गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाचपिरवाडी येथील वि. उत्कर्ष अर्थना गोरख मोहरे यांची अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी व्यात मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.
उत्कर्ष यांनी अखिल भारतीय स्तरावर २०५ वा क्रमांक मिळवत तसेच पाच दिवस चालणाऱ्या कठीण सेना सेवा निवड मंडळ (एसएसबी) मुलाखतीत उल्लेखनीय कामगिरी करत हे यश संपादन केले आहे. त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीचे हे फळ असल्याचे मानले जात आहे.
अकर्ष यांचे वडील गोरख मोहरे हे उद्योजक असून आई अर्चना मौहरे या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तसेच ले आदर्श शिक्षक राधाकिसन गुजर (गुरुजी) यांचे शिष्य व बाबाजी भक्त परिवारातील स्व. भिमराज मोहरे यांचे नातू आहेत. या यशाबद्दल पिंपळगाव, दिवशी, पाचपिरवाडी तसेच लासूर स्टेशन परिसरातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांकडून उत्कर्ष मोहरे यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

उत्कर्ष मोहरे यांनी अतिशय कमी वयात भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड मिळवून गावाचे नाव आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच नयी दिशा मिळेल.

- महेश गुजर, शेतकरी नेते

66 उत्कर्षच्या यशामागे त्याची कठोर मेहनत आणि देशसेवेची भावना आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. त्याने देशासाठी प्रामाणिकपणे सेवा करावी, हीच अपेक्षा आहे.

- गोरख मोहरे, वडील

66 एसएसबी मुलाखतीतील स्क्रीनिंग इनकी प्रक्रिया अनेक विद्यास्यर्यासाठी आव्हानात्मक ठरते, मात्र योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे यश निश्चित मिळू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इतर विद्याथ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, विद्याथ्यांची जिद्द, मेहनत व चिकाटी यामुळेच हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे. उत्कर्ष हा अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याच्या यशाने आमच्या शाळेचा आणि
- मकरंद देशमुख, एसपीआयचे संचालक कर्नल